Ganpati Aarti Marathi| मनोकामना पूर्ण करणारी आरती
श्री गणपती आरती : Ganpati aarti marathi lyrics
आरती-संग्रह- PDF Download: Ganpati aarti marathi pdf

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदूराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पूर्ण होती ॥धृ॥रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥२॥जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पूर्ण होती ॥धृ॥लंबोदर पितांबर फणीवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥३॥जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥sukhkarta dukhharta marathi lyrics
गणपती आरती संग्रह PDF | Ganpati Arati Sangrah PDF
श्री गणपतीची आरती
शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको |
दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको |
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको |
महिमा काहे न जाय लागत हुं पदको || १ ||
जय जय जी गणराज विद्यासुखदाता |
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता || धृ ||
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी |
विघ्नविनाशक मंगल मुरत अधिकारी |
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी |
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी || जय || २ ||
भावभगतसे कोई शरणागत आवे |
संतत संपत सबही भरपूर पावे |
ऐसे तुम महाराज मोको अति भावे |
गोसावीवंदन निशिदिन गुण गावे |
जय जय जी गणराज विद्यासुखदाता || धन्य || ३ ||
श्री शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा |
वीषे कंठी कला त्रिनेत्री ज्वाळा |
लावण्यसुंदर मस्तकी बाळा |
तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा || १ ||
जय देव जय देव जय श्रीशंकरा |
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा || धृ ||
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा |
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा |
विभूतीचे उधळण शितिकंठ निळा |
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा | जय देव || २ ||
देवी दैत्यी सागर मंथन पै केले |
त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले |
तें त्वां असुरपणे प्राशन केलें |
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले | जय || ३ ||
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी |
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी |
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी |
रघुकुळटिळक रामदासाअंतरी || जय देव || ४ ||
ganpati stotra in marathi text
श्री देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी |
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |
वारी वारी जन्ममरणाते वारी |
हरी पडलो आता संकट निवारी || १ ||
जय देवी जय देवी महिषसूरमथिनी |
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी || धृ ||
त्रिभुवन भुवनी पाहता तुजऐसी नाही |
चारी श्रमले परंतु न बोलवे काही |
साही विवाद करिता पडिले प्रवाही |
तें तू भक्तालागी पावसी लवलाही || जय || २ ||
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा |
क्लेशापासुनि सोडावि तोडी भवपाषा |
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा |
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा |
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी |
सुरवरईश्वरवरदे तारक || ३ ||
श्री दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |
त्रिगुणी अवतार त्रिलोक्यराणा |
नेति नेति शब्द नये अनुमाना |
सुरवरमुनिजन योगी समाधी न ये ध्याना || १ ||
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |
आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव || धृ ||
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त |
अभाग्यासी कैची कळेल हे मात |
पराही परतली तेथे कैचा हा हेत |
जन्ममरणाचा पुरलासे अंत || जय || २ ||
दत्त येउनिया उभा ठाकला |
भावे सांष्टागेसी प्रणिपात केला |
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला |
जन्ममरणाचा फेरा चुकविला || जय || ३ ||
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान |
हारपले मन झाले उन्मन |
मी तू झाली बोळवण |
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान || जय देव || ४ ||
श्री विठोबाची आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा |
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा |
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा || १ ||
जय देव जय देव जय पांडुरंगा ||
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा
पावे जिवलगा जय देव जय देव || धृ ||
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी |
कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी |
देव सुरवर नित्य येती भेटी |
गरुड हनुमंत पुढे उभे राहती || जय || २ ||
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा |
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा |
राई रखुमाई राणीया सकळा |
ओवाळिती राजा विठोबा सावळा || जय || ३ ||
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती |
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती |
दिंड्या पताका वैष्णव नाचती |
पंढरीचा महिमा वर्णावा किती || जय || ४ ||
आषाढी कार्तिकी भक्तजन येती |
चंद्रभागेमध्ये स्नाने जें करिती |
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती |
केशवासी नामदेव भावे ओवाळिती || जय देव जय देव जय || ५ ||
morya morya ganpati bappa morya lyrics
येई हो विठ्ठले आरती
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ठेवुनी वाट मी पाहें ।। येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
हो माझा मायबाप ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। १ ।।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। २ ।।
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ३ ।।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ४ ।।
श्री ज्ञानदेवाची आरती
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत || मनु वेधला माझा || आरती || धृ ||
लोपलें ज्ञान जगी | हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग | नाम ठेविले ज्ञानी || १ ||
कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो || साम गायन करी || २ ||
प्रकट गुह्य बोले | विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले |
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||
घालीन लोटांगण वंदीन चरण
घालीन लोटांगण वंदीन चरण।। डोळ्यांनी पाहीन रूप तुझें।।
प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन।। भावें ओवाळीन म्हणे नामा।।
त्वमेव माता च पिता त्वमेव।। त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव।।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव।। त्वमेव सर्वं मम देवदेव।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा।। बुद्धात्मना व प्रकृतिस्वभावअत्।।
करोमि यद्त्सकलं परस्मै।। नारायणायेति समर्पयामि।
अच्युतं केशवं रामनारायणं।। कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्।।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं।। जानकीनायकं रामचंद्रं भजे।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे।। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।
Bhakti & Adhyatm
Bhakti & Adhyatm Education | Spiritual Knowledge in Marathi
Sankat Nashan Ganesh Stotram Lyrics in Hindi English Marathi PDF – पूरी जानकारी आसान हिंदी में
jai shri ganesh : ganpati song download mp3
Shri Guru Charitra Parayan: श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे? महत्व व नियम




